राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी ऍड. भार्गव पाटील

उरण दि. २६ (विठ्ठल ममताबादे ) : राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा (अजीत दादा  पवार गट ) प्रचार प्रसार तळागाळात करणारे, नागरी समस्यांची जाण असणारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कट्टर व प्रामाणिक एकनिष्ठ कार्यकर्ते , पागोटे गावचे माजी सरपंच भार्गव. दा. पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी कार्यालयात ऍड. भार्गव पाटील यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष हनुमंत पिंगळे,रायगड जिल्हा चिटणीस किशोर ठाकूर,उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर,उरण तालुका अध्यक्ष परिक्षित ठाकुर, युवक उरण तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समत रऊफ भोंगले,उरण शहराध्यक्ष तूषार ठाकूर , पागोटे अध्यक्ष दिनेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
१९९७ साली ऍड.भार्गव पाटील यांनी समाज कारण करत राजकारणात प्रवेश केला. सर्व प्रथम उरण विभाग अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, थेट पागोटे ग्रामपंचायत सरपंच ,ग्राम विकास मंडळ पागोटे खजिनदार सेक्रेटरी अशी वेगवेगळी पदे त्यांनी भूषविली. पक्षाबद्दलचे त्यांचे कार्य विचार, प्रामाणिकपणा, एकनिष्ठता बघून पक्षातर्फे त्यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस पदी केली आहे.
ऍड. भार्गव पाटील यांच्या नियुक्ती मुळे राजकीय समीकरणे बदलणार असून भविष्यात विविध राजकीय पक्षातील हजारो कार्यकर्ते पदाधिकारी यांचा ऍड भार्गव पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पक्ष प्रवेश होणार आहे. पद नियुक्ती होताच ऍड भार्गव पाटील कामाला सुद्धा लागले आहेत.भार्गव पाटील यांच्यामुळे उरण मधील भाजपा, शिवसेना (शिंदे गट )राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट ) ही महायुती अजून भक्कम, मजबूत झाली आहे.भार्गव पाटील यांच्या राजकीय जीवनाचा,कार्याचा फायदा  नक्कीच एनडीए सरकारला  होणार आहे.
भार्गव पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस पदी निवड झाल्याने भार्गव पाटील यांनी खासदार सुनील तटकरे,मंत्री आदितीताई तटकरे,जिल्हाध्यक्ष हनुमंत पिंगळे तसेच राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE