ना. दीपक केसरकर यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात चेहरा ओळख प्रणालीचा शुभारंभ

पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती


रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात चेहरा ओळख प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.


यावेळी सिंधुरत्न कार्यकारी समितीचे विशेष निमंत्रित किरण सामंत, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी र्कीर्ती किरण पुजार,पोलीस अधीक्षक, धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शुभांगी साठे आदी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी कार्यालय अधिनस्त कार्यालयांमध्ये एकूण 9 तहसिल कार्यालये तसेच 5 उपविभागीय अधिकारी कर्यालये अशी 14 कार्यालये व जिल्हाधिकारी कार्यालय अशी एकूण 15 कार्यालये आहेत. सर्व 15 कार्यालयांध्ये चेहरा ओळख प्रणाली कार्यरत करण्यात आलेली आहे. या प्रणालीमुळे सर्व कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रत्यक्ष नियंत्रण राहणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांची कार्यालयातील वेळेवर उपस्थिती राहिल्यामुळे जनतेची कामे विहीत वेळेमध्ये पूर्ण करणे व शासकीय सेवा लवकरात लवकर जनतेला पुरविणे शक्य होणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE