‘आई तुझे देऊळ’ फेम सचिन ठाकूर यांच्या वाहन जळीत प्रकरणातील मुख्य आरोपीवर खटला दाखल

  • जसखार गावातील तरुणाविरोधात न्यायालयात खटला दाखल

उरण दि ५ (विठ्ठल ममताबादे ) : सुप्रसिद्ध नृत्य दिगदर्शक, आई तुझे देऊळ फेम, हिंदुस्थान रत्न राष्ट्रीय पुरस्कार तथा महाराष्ट्र भूषण श्री सचिन लहू ठाकुर यांची MH46BV2266 क्रमांकाची मारुती सिलेरिओ गाडी अज्ञात इसमानी जसखार ग्रामपंचायत निकालानंतर एका वर्षात सलग दोन वेळ त्यांच्या घरा शेजारी पार्किंगमध्ये जाळली होती. जानेवारी महिन्यात जेव्हा पहिल्यांदा गाडी जाळली तेव्हा शॉर्ट सर्किटमुळे गाडी जळाळी असेल असा प्राथमिक अंदाज न्हावा स्टेशन पोलीस अधिकारी ह्यांनी व्यक्त केला होता परंतु त्याच वर्षी दुसऱ्यांदा ऑगस्ट महिन्यात सचिन ठाकुर यांची गाडी जाळण्यात आली.त्यामुळे सचिन ठाकुर यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले.

सर्व प्रथम मी न्हावा शेवा पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस प्रशासनाचे, पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मानतो. राजकीय द्वेषातून वाहन जाळल्याने सदर संबंधित आरोपीवर कडक अशी कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच मूळ आरोपी कोण आहे याचाही शोध पोलिसांनी घ्यावा अशी मी विनंती करतो. आरोपीवर जास्तीत जास्त कडक कारवाई व्हावी.

सचिन ठाकूर, प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक,कलाकार, जसखार.

या घटने चे गांभीर्य लक्षात घेता वाढते गुन्हेगारीचे प्रमाण बघता न्हावा शेवा पोलीस स्टेशन च्या अधिकारी यांनी सदर प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी केली व सदर गुन्ह्यात कु. करण भरत घरत (रा. जसखार) याला मुख्य आरोपी म्हणून पकडण्यात आले आहे.

हा गुन्हा राजकीय द्वेष मनात ठेऊन करण्यात आला. पण हा गुन्हा कोणाच्या सांगण्या वरून केला हे अजून निष्पन्न झाले नाही.आता हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे या गुन्ह्या मागील प्रमुख सूत्रधार कोण आहे, हे लवकरच न्यायालयासमोर येणार आहे.

सचिन ठाकूर यांच्या वाहन जळीत प्रकरणातील आरोपीला पकडण्यात आले असून त्याच्यावर चार्जशीट सुद्धा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे.

-संजय मोहिते
सहाय्यक पोलीस निरीक्षक
न्हावा शेवा पोलीस ठाणे,


सदर गुन्हे प्रकरणात न्हावा शेवा पोलीस स्टेशन अधिकारी यांना आरोपी शोधण्यात यश आल्याने युवा सामाजिक संस्था व सचिन ठाकूर च्या हितचिंतकांनी पोलीस प्रशासनाचे अधिकारी वर्गाचे आभार मानले.व भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये या करीता तरुणांनी राजकीय नेत्यांचा अमिषाला बळी न पडता अशा प्रकारचे गंभीर कृत्ये न करता आपला व आपल्या कुटुंबाचा भविष्या चा विचार करावा असे प्रतिपादन न्हावा शेवा स्टेशन च्या अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE