देवरूख : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व रत्नागिरी जिल्हा क्रिडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या सहकार्याने जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा ङेरवण क्रीडा संकुल चिपळूण येथे 14,,17, 19 वयोगटामध्ये संपन्न झाली. यामध्ये संगमेश्वर तायक्वांदो पटूनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी प्रदर्शन करत 9 सुवर्ण, 8 रौप्य,1 कांस्य अशी पदके पटकावली.
राज्य क्रिडा मार्गदर्शक सचिन मांडवकर ङेरवण क्रिडा संकुलनाचे संचालक श्रीकांत पराडकर, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, खजिनदार शशांक घडशी, तालुका समन्वयक समीर कालेकर, सचिव प्रविण आवळे यांची प्रमुख उपस्थित उद्घाटन झाले.
या स्पर्धेसाठी जिल्हातील सुवर्णपदक पटकावले खेळाडू सहभागी झाले होते. या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या खेळाडूंची निवड विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये संगमेश्वर तायक्वांदो पट्टूंनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी प्रदर्शन करत 9 सुवर्ण, 8 रौप्य,1 कांस्य अशी पदके पटकावली.
या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये पदक पटकावलेल्या खेळाडूंचा छोटेखानी सत्कार समारंभ क्लब अध्यक्षा सौ.स्मिता लाड, प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी,उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, उपाध्यक्षा ॲ.पूनम चव्हाण, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यशस्वी खेळाडूमध्ये अरुंधती अरुण पाद्धे इंग्लिश मीडियम स्कूल देवरुख 3 सुवर्णपदक साहिल जागुष्टे, अर्णव रेडीज, स्वराली शिंदे, 1 रौप्य पदक सान्वी जागुष्टे, न्यू इंग्लिश स्कूल देवरुख 2 सुवर्णपदक यश जाधव, दीक्षा मोहिते, 3 रौप्य पदके तनिष खांबे, धनंजय जाधव, प्रणित कांबळे. माध्यमिक आश्रम शाळा निवे 2 सुवर्णपदक राज रसाळ, साहिल सकपाळ,1 रौप्य पदक सान्वी रसाळ, 1 कांस्य पदक आयुष वाजे सहभागी खेळाडू ऋतिक रसाळ. मीनाताई ठाकरे हायस्कूल साडवली 1 रौप्य पदक समीक्षा पाटील, सहभागी खेळाडू समृद्धी घडशी. कसबा हायस्कूल 1 सुवर्ण पदक सोहम मालगुंडकर, पैसा फंड हायस्कूल संगमेश्वर 1 सुवर्ण पदक ओम घाग, सहभागी खेळाडू मंथन चव्हाण, गंधर्व शेट्ये,आदित्य आंबवकर.पी.एस. बने इंटरनॅशनल स्कूल साडवली 1 रौप्य पदक खेळाडू मृणाल मोहिरे यांचा समावेश आहे.
या यशाबद्दल तालुका अकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुभाष बने, आमदार शेखर निकम, रोहन बने, अकॅडमीचे उपाध्यक्ष परेश खातू आदींनी अभिनंदन केले.
