- जिल्ह्यातील आंबोळगड, गणपतीपुळे, वेलदूर, कर्दे व वाल्मिकीनगर गावांचा समावेश
रत्नागिरी दि. ७ (जिमाका) : चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी आज टेबलटॉप एक्जरसाईज अर्थात नियोजन करण्यात आले. प्रत्यक्ष राज्यस्तरीय रंगीत तालीम गुरुवारी होणार आहे. यात जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आंबोळगड, रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे, गुहागरमधील वेलदूर, दापोली मधील कर्दे आणि मंडणगड मधील वाल्मिकीनगर या ५ गावांचा समावेश आहे. चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी होणाऱ्या रंगीत तालिमीच्या अनुषंगाने मंगळवारी नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली.
या बैठकीला मेरीटाईम बोर्डचे बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगले, भारतीय तटरक्षक दलाचे जितेंद्र कुमार, मत्स्यविकास अधिकारी आनंद पालव, उपविभागीय पोलीस अधीक्षक निलेश माईनकर, इंडस्ट्रीयल सेफ्टी ॲण्ड हेल्थचे उपसंचालक प्रदीप भायतोंडे, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त अभयसिंह शिंदे इनामदार, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता डी.जी. सकपाळ आदी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील या ५ गावांमध्ये गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी १ या दरम्यान होणाऱ्या रंगीत तालिमीच्या अनुषंगाने आजच्या बैठकीत विशेष नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले
