गो-सेवा संघ रत्नागिरीतर्फे वसुबारस कार्यक्रम उत्साहात

रत्नागिरी : रोजी दिपावलिची सुरवात होत असलेल्या वसुबारस या दिनाचे औचित्त्य साधुन दर वर्षी प्रमाणे याही वर्षी गो सेवा संघ रत्नागिरी यांनी दि. ९ नोव्हेंबर रोजी वसुबारशीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभला. गो सेवा संघाच्या या कार्यक्रमामध्ये गो पुजन व्याख्यान व सत्कार असे आयोजन करण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांचा सत्कार करताना गो सेवा संघ रत्नागिरीचे उजवीकडून सर्वश्री विशाल पटेल, गणेश गायकवाड, गोसेवक मुकेश गुंदेचा, सुशील कदम आणि अन्य कार्यकर्ते.

होते. त्याप्रमाणे शास्त्रोक्त पध्दतीने गौमातेचे व वासराचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरवात झाली. गौपुजन हे जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक मा.श्री धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडले तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहुन श्री. धनंजय कुलकर्णी यांनी गो सेवा संघाच्या कार्याची प्रशंसा केली व पोलिस खाते गौरक्षणासाठी सदैव सज्ज असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे व्याख्याते सौ.रसिलाताई पटेल यांनी गो सेवेचे महत्व, गायी चे वैज्ञानिक व भौगोलिक महत्व पटवुन देत गायीला आपण घरातुन बाहेर काढल त्याच सोबत आपले आरोग्य ही गेले असे प्रतिपादन केले व उत्कृष्ट मार्गदर्शन केले. तसेच गो सेवा संघा साठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहाय्य करणार्या सेवा संस्था, संघटना, गोसेवक यांचे सत्कार करण्यात आले.

यावेळी भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्तेक गौमातेला हक्कचे घर मिळवण्यासाठी गो सेवा संघ प्रयत्नशिल आहे. त्यासाठी जमिन व आर्थिक गोष्टींची तडजोड करण्यासाठी प्रत्तेकाने प्रयत्न करावे जेणेकरुन आपणांस रत्नागिरी जिल्ह्यामधे एक प्रशस्त व आधुनिक गोशाळा उभारता येइल जिथुन गौसेवेचे महत्व व फायदे शेतकऱ्यांना पटवुन देउन शेतकऱ्यांच्या घरोघरी ही गाय पुन्हा आणता येइल,व तिच्याच गोमेय व गोमुत्रातुन आर्थिक उत्पन्न देखिल निर्माण होइल अशी व्यवस्था गो सेवा संघ भविष्यात उभी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी शासकीय पातळीवरही प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती गो सेवा संघाचे अध्यक्ष श्री गणेश गायकवाड यांनी दिली.

यावेळी गो सेवा संघाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE