देवरूखमधील बाजीराव पेशवे उद्यानाचा १६ नोव्हेंबरला भूमिपूजन सोहळा

देवरूख (सुरेश सप्रे) : देवरुख नगर पंचायतीच्या जागेत देवरूख चोरपऱ्याजवळ जेष्ठ समाजसेवक मदन मोडक यांच्या संकल्पनेतून व आर्थिक योगदानातून साकारण्यात येत असलेल्या प्रतापसूर्य बाजीराव पेशवे उद्यानाचा भूमिपूजन समारंभ दि. 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता आमदार शेखर निकम यांच्या हस्ते व माजी आमदार प्रमोद जठार,
देवरुखचे मुख्याधिकारी चेतन विसपुते, माजी नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत देवरुख- संगमेश्वरसौ. रस्त्यालगत चोरपऱ्या येथे संपन्न होत आहे.

या देवरुख शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या भुमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहवे, असे आवाहन मदन मोडक यांनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE