श्री क्षेत्र कपिलधार येथे २६ नोव्हेंबरला शिवा संघटनेचा राज्यव्यापी मेळावा

  • मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधवांना आवाहन
  • विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांना दिला जाणार शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कार.

उरण दि 11(विठ्ठल ममताबादे ) : वीरशैव लिंगायत समाजाच्या न्यायहक्कासाठी कार्यरत असणाऱ्या, वीरशैव लिंगायत समाजाचे देशातील सर्वात प्रभावी व आक्रमक समजल्या जाणाऱ्या शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे रविवार दि. 26 नोव्हेंबर 2023 रोजी 28 वा राज्यव्यापी मेळावा श्री क्षेत्र कपिलधार, जिल्हा बीड येथे दुपारी 3:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी श्री मन्मथ स्वामींची 22 वी शासकीय महापूजा शासनातर्फे मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार आहे. शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेतर्फे आयोजित राज्यव्यापी मेळाव्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक समाज बांधवांना यावेळी शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

वीरशैव लिंगायत समाजाची वज्रमूठ तयार करून समाजाला एकसंध बनवून समाजाला त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यात तसेच वीरशैव लिंगायत समाजात अस्मिता, स्वाभिमान, एकसूत्रता निर्माण करण्यात देशात, महाराष्ट्र राज्यात शिवा संघटनेची भूमिका अत्यंत महत्वाची राहिली आहे. अशा या शिवा संघटनेच्या 28 व्या राज्यव्यापी मेळाव्याला व संत शिरोमणी मन्मथ स्वामींची 22 व्या शासकीय महापूजेसाठी वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी, शिवा संघटनेच्या पदाधिकारी -कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी केले आहे.

या मेळाव्याला केंद्रिय राज्यमंत्री मा. ना. डॉ भागवत कराड नवी दिल्ली व महाराष्ट्रातील बीडचे पालकमंत्री मा. ना. धनंजय भाऊ मुंडे, शिवसेना नेते मा. श्री चंद्रकांत खैरे, माजी मंत्री मा. पंकजाताई मुंडे, खा. डॉ. प्रितमताई मुंडे, माजी मंत्री मा. आ. जयदत्त अण्णा क्षीरसागर व इतर लोकप्रतिनीधी यांच्यासह अनेक मान्यवर व वीरशैव लिंगायत समाजाचे शिवाचार्य, धर्मगुरू, शिवा संघटनेचे राष्ट्रीय, राज्यस्तरीय पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

दरवर्षी शिवा संघटनेच्या राज्यव्यापी मेळाव्याला मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातून हजारो शिवा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित असतात .दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र कपिलधार, जिल्हा बीड, महाराष्ट्र राज्य येथे जाण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातून वाहनांची सोय केली असून शिवा संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, शिवभक्तांनी शिवा संघटनेच्या खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

डोंबिवली विभाग : रुपेश होनराव -9892869039,

ठाणे विभाग : शिवा बिराजदार -9820535330,

पालघर जिल्हा : शान्तेश्वर गुमते 9623862285, 8390908146

रायगड विभाग -नारायण कंकणवाडी -9594862000,

रायगड विभाग : विनायक म्हमाने -9967544387,

रायगड विभाग : विठ्ठल ममताबादे-9702751098

नवी मुंबई विभाग : देवेंद्र कोराळे -9869429210
यांच्याशी संपर्क साधावे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE