राज्यस्तरीय बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेत परशुराम राऊत, श्रद्धा इंगळे विजेते

  • तेरा वर्षांखालील गटात विश्वजित ठावली, सोयरा शेलारला विजेतेपद


रत्नागिरी : रत्नागिरीत झालेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेत 11 वर्षांखालील गटात परशुराम राऊत, श्रध्दा इंगळे तर 13 वर्षांखालील गटात विश्वजित ठावली, सोयरा शेलारने विजेतेपद पटकावले.

रत्नागिरीतील सर्वंकष विद्यामंदिरच्या बॅडमिंटन कोर्ट्वर या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत 11 वर्षांखालील गटात परशुराम राऊतने जतीन सराफचा पराभव केला. मुलींमध्ये श्रध्दा इंगळेने हेजल जोशीचा पराभव करून विजेतेपद पटकावले. दूहेरीमध्ये जयदेन मॅथ्यु-रूद्रा मनोहर या जोडीने यश अग्रवाल-योहान कल्याणी यांच्यावर मात करत विजेतेपद पटकावले. 13 वर्षांखालील गटात विश्वजित ठावलीने मयुरेश भुक्तीवर मात केली. मुली गटात सोयरा शेलारने वैष्णवी मांगलेकरचा पराभव केला.

रत्नागिरी ः राज्य बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेतील यशस्वी खेळाडू.

दूहेरीत मयुरेश भुक्ती-विश्वजित ठावली या जोडीने सयाजी शेलार-उदयन देशमुख या जोडीचा पराभव करत विजेदेपद पटकावले. तसेच आदिती यादव-प्रांजल दधीआ या जोडीचा रिशा परब-श्रावणी बामणकर यांचा पराभव केला. विजयी झालेल्या खेळाडूंचा पारितोषीक देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी गद्रे सी फूड्सच्या संचालिका सौ. मीनाताई गद्रे, सावंत ओयासिसचे केतन सावंत, देसाई फूड प्रोडक्ट्स चे अमर देसाई, करुण्या मारिन चे कुरियन अब्राहम, स्टेट टॅक्स ऑफिसर ठोंबरे, महावितरण चे असिस्टंट जनरल मॅनेजर वैभव थोरात, भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडू सरोज सावंत, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष ओंकार हजारे, प्रशिक्षक समितीचे सदस्य अमित मुळये, जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश आराध्यमठ, प्रशिक्षक विनीत पाटील, प्रशिक्षक सुधीर बाष्टे, प्रशिक्षक सुधीर चेनूर आदी उपस्थित होते.

या प्रसंगी कारुण्य मरिनचे कुरियन अब्राहम यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. या स्पर्धेला गद्रे सी फूड्स, इंडियन ऑइल, सावंत ओयासिस स्पोर्ट्स, देसाई फूड प्रोडक्ट्स, कारुण्या मारिन आणि योनेक्स सनराईस यांचे सहकार्य लाभले. रत्नागिरी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनवर सलग 10 वर्षे विश्वास ठेऊन आणि सपोर्ट करून स्पर्धा घेण्याची संधी दिल्याबद्दल महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे आभार मानण्यात आले. या स्पर्धेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यातील सुमारे 300 हून अधिक खेळाडून सहभागी झाले होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE