देवरूख : शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख प्रमोद पवार आणि तालुका संघटक प्रल्हाद (पपू) गायकवाड यांनी केलेल्या आवाहनानुसार युवासेना उपतालुका प्रमुख सुधिर चाळके यांच्या संकल्पनेतू डिंगणी गावात एक दिवा सैनिकांसाठी उपक्रम राबवला गेला. या वेळी 1965 साली भारत पाकिस्तान युद्धामध्ये शहीद झालेले डिंगणीचे सुपुत्र करंडे यांच्या स्मारकला अभिवादन करून दिवे लावण्यात आले.
यावेळी माजी सैनिक सुभेदार अनिल टोलू पवार संगमेश्वर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल केशव मुटगर, कॉन्स्टेबल समित मालगुंडकर. डिंगणी व तंटामुक्ती अध्यक्ष भगवान खाडे माजी सरपंच तुकाराम पाकतेकर माजी पोलीस पाटील पांडुरंग पेजे शाखाप्रमुख विशाल कदम. उदय जोगळेकर. विनायक कदम विश्वनाथ जोगळेकर. संदीप करंडे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
