उरण महाविद्यालयाची आदिवासी बांधवांसोबत दिवाळी

उरण दि 12 (विठ्ठल ममताबादे ) : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाची माजी विद्यार्थी संघटना व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बळीराम एन.गायकवाड व प्रा. के. ए. शामा यांच्या मार्गदर्शनाखाली विंधणे आदिवासी  वाडी येथील कातकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.
यावेळी वाडीवरील 130 महिलांना साड्या व लुगडी वाटप केले तसेच एकूण 125 पुरुषांना टॉवेल, एकूण 70 मुलांना शालेय साहित्य व विद्यार्थ्यांनी आणलेला घरी तयार केलेला दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला. प्रा.के. ए.शामा सर यांच्या संकल्पनेतून गेली एकवीस वर्ष महाविद्यालय आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करत असते. आदिवासी बांधवांनाही हा सण आनंदाने साजरा करता यावा, या उद्देशाने महाविद्यालयाने हा उपक्रम हाती घेतला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बळीराम एन. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांमध्ये गरीब समाजा प्रति आत्मीयता वाढावी व त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले.
यावेळी रमेश ठाकूर (महाविद्यालय विकास समितीचे सदस्य) उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य बी. एन. गायकवाड रु.2000,  के.ए.शामा रु.5000, प्रा. व्ही एस इंदुलकर रु.5000, डॉ. पराग कारुलकर रु.4000, कार्यालयीन अधीक्षक टी. एन. घ्यार रु.5000, टी वाय बी ए माजी विद्यार्थी रु.3000, माजी विद्यार्थ्यांमध्ये  विशाल पाटेकर ( मी उरणकर सामाजिक सांस्कृतिक संघटना) रु.10000, सुरज म्हात्रे रु.10000,  नरेंद्र पाटील रु.10000, तेजस आठवले रु.2000, रोहित पाटील रु.5000,  मंगेश म्हात्रे रु.3000 ,नवीन राजपाल रु.3000 तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आर्थिक मदत केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष  विशाल पाटेकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी  डॉ. दत्ता हिंगमिरे, आयक्युएसी समन्वयक डॉ. ए. आर. चव्हाण,  सुरज म्हात्रे (टाकीगाव) महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE