उरण दि 11 (विठ्ठल ममताबादे ) : आपण ज्या समाजात मोठे होतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या सामाजिक जाणिवेतून उरण तालुक्यातील मोरा रोड वरील बोरी नाका येथील स्वामी ब्रहमानंद प्रतिष्ठानचे सीबर्ड विशेष मुलांची शाळेत कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ वाटप तसेच चित्रकलेची वही,कलर पेटी, केऑन बॉक्स आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेचे मिडीया सल्लागार विठ्ठल ममताबादे यांनी संस्थेच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती दिली. विद्यार्थ्यांना फराळ वाटप व शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. यावेळी कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुमित पाटील,उपाध्यक्ष नकूल पाटील, सचिव प्रणय पाटील,सहसचिव प्रथम तांडेल, खजिनदार सुरेंद्र पाटील, कार्याध्यक्ष ऋषिकेश म्हात्रे, सल्लागार रमेश पाटील, सरपंच कुणाल पाटील, उपसरपंच सतीश पाटील, ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष सुरेंद्र पाटील , सामाजिक कार्यकर्ते अरुण पाटील, शिवसेना उपशाखा प्रमुख महेश पाटील, सुप्रसिद्ध निवेदक अतिश पाटील, रोशन म्हात्रे, आकांक्षा म्हात्रे,अमित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वामी ब्रह्मनंद प्रतिष्ठानचे सिबर्ड विशेष मुलांची शाळेचे मानद सचिव शिरीष पुजारी, विश्वस्त चारू शहा, सुपरवायजर माधुरी उपाध्ये, मुख्य शिक्षिका पल्लवी परदेशी, शिक्षिका मानसी पांचाळ, शिक्षक राकेश म्हात्रे व शाळेच्या कर्मचाऱ्यांनी एका चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने व दिवाळी विद्यार्थ्यांसोबत साजरी केल्याने कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांचे व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
