शिवसेना उरणच्या वतीने ‘दिवाळी संध्या’ संगीतमय कार्यक्रमाने उरणकर नागरिक मंत्रमुग्ध !

उरण दि १५(विठ्ठल ममताबादे ) : मंगळवार १४ नोव्हेंबर २०२३ रोजी दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर उरणवासीयांना संगीत नजराणा शिवसेना (श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे) उरणतर्फे माजी आमदार तथा रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या आयोजनातून सरस्वती संगीत कला वर्ग प्रस्तुत  ‘दिवाळी संध्या’ या संगीत गायनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता,संगीत विशारद कीर्ती रमेश गोंधळी यांची कन्या कु.आसावरी रमेश गोंधळी तसेच कु युगांती पाटील,  प्रेरणा पाटील, कु. अंजली म्हात्रे, कु. संस्कृती मोकल व कु. अवंती गोगटे यांच्या सुमधुर गायनाने उरणकर मंत्रमुग्ध झाले. त्यांना महेश घाटे, मधुकर घोगडे, भूषण गायकर यांनी संगीत साथ दिली तर कार्यक्रमाचे उत्तम निवेदन केशव साळवी यांनी केले, सदर कार्यक्रमात विविध रागामध्ये बंदिश,भक्तीगीते व भावगीते सादर करून उरणकरांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाला उरणकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता.
या कार्यक्रमाला माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे,शहरप्रमुख  विनोद म्हात्रे, उपतालुका संघटक  के एम घरत, नगरसेवक  अतुल ठाकूर,  निलेश भोईर, शहर संघटक  दिलीप रहाळकर, महेश वर्तक,  प्रवीण मुकादम, अल्पसंख्याक सेलचे विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम, शहर अध्यक्ष मुमताज भाटकर, उपाध्यक्ष सायरा खान, शाखा संघटिका रुकसना सय्यद, जेष्ठ कार्यकर्ते  मनोज पाटील,  सुधाकर पाटील, संतोष पवार, कामगार नेते गणेश घरत, शिक्षक सेनेचे  कौशिक ठाकूर, महेश गावंड,  रमणीक म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो, जेष्ठ पत्रकार घन:श्याम कडू, श्री. पवार, पत्रकार विठ्ठल ममतावादे, विधी व न्याय सेलचे उपाध्यक्ष  मच्छिंद्रनाथ घरत, सोशल मीडियाचे समन्वयक नितीन ठाकूर, ग्राहक संरक्षण कक्षाचे शहर संघटक संदीप जाधव, विभागप्रमुख  संजय गावंड,  वैभव करगुटकर, शाखाप्रमुख सचिन पाटील, रमेश गोंधळी, प्रवीण म्हात्रे,गटप्रमुख  रुपेंद्र गुडेकर, उपशाखाप्रमुख  शाहरुख गडी,नागाव सरपंच सी. के. गायकवाड, ज्येष्ठ नागरीक संघाचे पदाधिकारी चंद्रकांत मुकादम, डॉ.साहेबराव ओहोळ, रमाकांत म्हात्रे, ज्येष्ठ नागरिक व मोठ्या संख्येने उरणकर नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक सेनेचे महेश गावंड यांनी आभार मानले.
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE