राष्ट्रीय एकात्मता दिनाची दिली शपथ
रत्नागिरी, दि. १९ (जिमाका) :- देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर यांनी पुष्पहार अर्ण करुन अभिवादन केले. या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता दिनाची शपथही त्यांनी दिली.

“मी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो/घेते की, देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्याठी व दृढ करण्यासाठी मी निष्ठापूर्वक काम
करीन “
मी अशीही प्रतिज्ञा करतो/करते की, मी कधीही हिंसाचाराचा अवलंब करणार नाही. तसेच मी सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय वा आर्थिक गा-हाणी शांततामय आणि संविधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवीन, अशी शपथ यावेळी घेण्यात आली.
