मकरंद अनासपुरे आणि तेजस्विनी लोणारी यांच्या दमदार जोडीचा ‘छापा काटा’ चित्रपटाचा पोस्टर लॉंच

मुंबई : महाराष्ट्राचे फेवरेट अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी नव्या कोऱ्या ‘छापा काटा’ चित्रपटातून धमाकेदार भूमिकेत येत आहेत. ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ धमाल विनोदी चित्रपटाचा २१ नोव्हेंबर २०२३ रोजी दणक्यात पोस्टर लॉंच झाला असून रसिक प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. चित्रपट १५ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना चित्रपटगृहात भन्नाट मनोरंजन अनुभवता येणार आहे.

‘ढ लेकाचा’ ‘कुलस्वामिनी’ ‘बोल हरी बोल’ आणि ‘हिरा फेरी’ या सुपरहिट चित्रपटांनंतर श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी ‘छापा काटा’ चित्रपटाची निर्मिती केली असून संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा आणि दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांच्यासोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर हे सुप्रसिद्ध अभिनेते प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहेत. या सर्व अभिनेत्यांची झलक असणारा चित्रपटाचा पोस्टर चित्तवेधक असून प्रेक्षकांना जबदरस्त आकर्षित करत आहे.

अधिक माहितीसाठी
Facebook : https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02ZTPEiCejm74FBj52EBfq9Yi4G5tyL4Mon26o3u9JFDHhktG7fV6HmR9FYsXpjyARl&id=100064582424281&sfnsn=wiwspwa&mibextid=RUbZ1f
Twitter : https://x.com/UltraMarathi/status/1726880242680365269?s=20
प्रसिद्धी जनसंपर्क : राम कोंडीलकर,
राम पब्लिसिटी, मुंबई
इमेल : ramkondilkar.pr@gmail.com
मोबाईल – WhatsApp : 9821498658

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE