रत्नागिरी : तालुक्यातील पूर्णगड सागरी पोलिस ठाणे हद्दीमधील गावडे-आंबेरे या गावातील समुद्रकिनारी विठ्ठल रुखमाई उत्सव मंडळ व पूर्णगड पोलीस यांचे संयुक्त विद्यमाने नौका नयन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये पूर्णगड, गावडे आंबेरे, गावखडी, गणेशगुळे या गावातील एकूण 12 संघांनी आपला सहभाग नोंदविला.
या स्पर्धेचे औचित्य साधून नागरिकांमध्ये सागरी सुरक्षा टोल फ्री क्र. 1093 व डायल 112 बाबत जनजागृती करण्यात आली.
