पालकमंत्री उदय सामंत यांची पावस येथील दर्ग्याला भेट

रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या जिल्हा दौऱ्यात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील पावस येथील मोहम्मद पीर बाबा दरगाह उरूसानिमित्त चादर अर्पण करून आशीर्वाद घेतले व मुस्लिम बांधवांना उरूसच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी तालुकाप्रमुख महेश तथा बाबू म्हाप, दर्गा कमिटी अध्यक्ष फैज अली फडनाईक, फैजल झारी, दाउद मुजावर, वसीम मालदार, फैय्याज फडनाईक, वरिष्ठ पत्रकार अलिमियां काझी आदी उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE