उद्याची उधना-मंगळुरू एक्सप्रेस देखील जादा डब्यांसह धावणार!

रत्नागिरी : ख्रिसमस तसेच हिवाळी पर्यटन हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्यांना गर्दी वाढल्यामुळे सुरतजवळील उधना ते मंगळूरु दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीला स्लीपरचे दोन डबे वाढवण्यात आले आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार हा बदल तात्पुरत्या स्वरूपाचा आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार (09057/09058) या उधना ते मंगरूळ दरम्यान धावणाऱ्या गाडीला 10 डिसेंबरच्या फेरीसाठी तर ही गाडी परतीच्या प्रवासात असताना 11 डिसेंबर 2023 रोजीच्या फेरीसाठी स्लीपर श्रेणीचे दोन अतिरिक्त डबे जोडले जाणार आहेत.

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना सध्या गर्दी होत आहे. नियमित गाड्यांच्या विशेष गाड्या सुरू करूनही अनेक प्रवाशांना गाडीचे कन्फर्म तिकीट मिळणे अवघड झाल्याने प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वेकडून प्रवाशांच्या मागणीनुसार गाड्यांना अतिरिक्त डबे जोडले जात आहेत. उधना ते मंगळुरू दरम्यान धावणाऱ्या गाडीला याआधी देखील अतिरिक्त डबे जोडून चालवण्यात आले. आता दिनांक 10 व 11 रोजी च्या फेरीसाठी या गाडीला स्लीपरचे दोन जादा डबे जोडले जाणार आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE