Konkan Railway | रत्नागिरी-सावंतवाडी दरम्यान १५ डिसेंबरला अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’

 

  • लांब पल्ल्याच्या दोन एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगा ब्लॉकच्या कालावधीत या भागातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या दोन एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार सावंतवाडी ते रत्नागिरी दरम्यान रेल्वेकडून दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी सकाळी ७ ते ९.३० या वेळेत अडीच तास मेगा ब्लॉक असणार आहे.

मेगा ब्लॉकचा परिणाम होणाऱ्या गाड्या


१) मेगा ब्लॉकमुळे एर्नाकुलम ते हजरत निजामुद्दीन (12617) एक्सप्रेस जिचा प्रवास मूळ ठिकाणावरून 14 डिसेंबर रोजी प्रवास होतो ती गाडी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान एक तास 45 मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.

२) गाडी क्रमांक 20923 ही तिरुनल वेली ते गांधीधाम दरम्यान धावणारी लांब पल्ल्याची एक्सप्रेस गाडी जिचा प्रवास मूळ ठिकाणावरून दिनांक 14 डिसेंबर रोजी सुरू होतो ती गाडी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान एक तास दहा मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.


दिनांक 15 डिसेंबर रोजी च्या मेगा ब्लॉकच्या कालावधीत मेगाब्लॉक चा परिणाम होणाऱ्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.

 

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE