उरण येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन

उरण दि १० (विठ्ठल ममताबादे ) : केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रा आज दि. ९/१२/२०२३ रोजी उरण येथील नगर परिषद शाळा क्रमांक १ येथे आयोजित करण्यात आली. सदर यात्रेत आधार कॅम्प, आयुष्यमान भारत,हेल्थ कॅम्प,मुद्रा लोन, प्रधान मंत्री जन आरोग्य योजना,प्रधान मंत्री उज्वला योजना,प्रधानमंत्री स्वनिधी योजना या केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ उरणमधील नागरिकांनी घेतला.
सदर यात्रेचे आयोजन उरण नगर परिषदे मार्फत करण्यात आले. यात्रेचे उदघाटन माजी नगराध्यक्षा सायली सविन म्हात्रे यांचे हस्ते झाले . सदर कार्यक्रमास उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव उपस्थित होते. तसेच माजी नगराध्यक्ष रवी भोईर, माजी नगरसेवक कौशिक शाह, माजी उपनगराध्यक्ष जयवींद्र कोळी, माजी नगरसेवक नंदू लांबे, माजी नगरसेविका प्रियंका पाटील, प्रसाद मांडेलकर आदी उपस्थित होते. तसेच झुंबर माने(बांधकाम इंजिनियर),सुरेश पोसतांडेल (लेखापाल),अनिल जगधनी (प्रशासकीय अधिकारी), संजय डपसे (कर निरिक्षक), हरेश तेजी (आरोग्य निरीक्षक) तसेच उरण नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सदर यात्रेत केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ उरण मधील नागरिकांनी मोठया प्रमाणात घेतला.
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE