पाली (रायगड ) : गेल्या कित्येक वर्षापासून बंद असलेली मुंबई – पाली सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे अध्यक्ष अपेक्षित कुळये यांच्याकडून करण्यात आली आहे.
श्री श्रेत्र पाली हे गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आहे. परंतु, मुंबई येथून गाडी सुरू नसल्यामुळे प्रवाशांना व अनेक गणेश भक्तांना त्रास सहन करावा लागत आहे. या बसला प्रवाशांकडून मागणी असून देखील मुंबई सेंट्रल आगार प्रशासनाकडून ही सेवा बंद करण्यात आली आहे. ही सेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी कोकण एसटी प्रेमी ग्रुपच्या वतीने एसटीचा महाव्यवस्थापक यांच्याकडे करण्यात आली आहे.
