पनवेल आणि मडगाव दरम्यान १४ नाताळ-नवीन वर्ष विशेष गाड्या धावणार!

रत्नागिरी : रेल्वे नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्टीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पनवेल आणि मडगाव दरम्यान १४ नाताळ/नवीन वर्ष विशेष टरेल्वे गाड्या चालविल्या जाणार आहेत.


कोकण रेल्वे मार्गावर धावणार असलेल्या या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

०१४२७/०१४२८ पनवेल- मडगाव-पनवेल विशेष (१२ फेऱ्या)

०१४२७ पनवेल – मडगाव जं.
दि. २२.१२.२०२३ ते दि. ३१.१२.२०२३ (६ फेऱ्या) पर्यंत दर शुक्रवार, शनिवार आणि रविवार रोजी २१.१० वाजता विशेष पनवेल येथून सुटेल आणि मडगाव जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी ६.५० वाजता पोहोचेल.

०१४२८ मडगाव – पनवेल स्पेशल मडगाव जं.
दि. २२.१२.२०२३ ते दि. ३१.१२.२०२३ (६ फेऱ्या) दर शुक्रवारी, शनिवार आणि रविवारी सकाळी ८.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २०.१५ वाजता पनवेल येथे पोहोचेल.

थांबे : रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी.

संरचना: २२ डब्बे- ६ वातानुकूलित तृतीय, ४ शयनयान, १२ सामान्य द्वितीय श्रेणी गार्ड्स ब्रेक व्हॅनसह.

०१४२९/०१४३० पनवेल- मडगाव-पनवेल नवीन वर्ष विशेष (२ फेऱ्या)

०१४३० मडगाव – पनवेल नववर्ष विशेष गाडी मडगाव जं. येथून दि. ०१.०१.२०२४ रोजी २१.००वाजता (एक फेरी) सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ०७.२० वाजता पोहोचेल.

०१४२९ पनवेल – मडगाव जं. नवीन वर्ष विशेष पनवेल
दि. ०२.०१.२०२४ रोजी ८.२० वाजता सुटेल (एक फेरी) आणि मडगाव जंक्शन येथे त्याच दिवशी २१.३० वाजता पोहोचेल.

थांबे: रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी.

संरचना: २२ डब्बे- ६ वातानुकूलित तृतीय, ४ शयनयान, १२ सामान्य द्वितीय श्रेणी गार्ड्स ब्रेक व्हॅनसह.

आरक्षण: ट्रेन क्रमांक ०१४२७/२८ आणि ०१४२९/३० च्या फेरीसाठी बुकिंग लवकरच सुचित केली जाईल.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE