रत्नागिरी : नागपूर ते मडगाव अशा कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या विशेष गाडीच्या फेऱ्या 31 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. नागपूर येथून थेट कोकणात येण्यासाठी मागील काही महिन्यांपासून विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत.
नागपूर येथून थेट कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या गाड्यांची मागणी लक्षात घेऊन मागील काही महिन्यांपासून (01139/01140) या गाडीच्या फेऱ्या चालवल्या जात आहेत. त्या गाडीला असलेली मागणी लक्षात घेऊन नागपूर ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीला (01139) दिनांक 3 जानेवारी 2024 ते 30 मार्च 24 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर मडगाव ते नागपूर मार्गावर धावणाऱ्या गाडीसाठी (01140) दिनांक ४ जानेवारी 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
आठवड्यातून दोन दिवस ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर धावते.
- हेही अवश्य वाचा : Konkan Railway | दिवा-रत्नागिरी पॅसेंजर लवकरच धावणार नव्या रंगरूपात !
- Konkan Railway | तीन महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून ८६ लाख ६७ हजारांचा दंड वसूल
- Konkan Railway | ख्रिसमससाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी चार विशेष गाड्या
