रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी 23 डिसेंबर 2023 रोजी सुटणारी जामनगर ते तिरूनेलवेली ही दूर पल्ल्याची एक्सप्रेस गाडी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून वसई, पनवेल, रत्नागिरी मार्गे ही गाडी दक्षिणेतील तिरुनेलवेलीला जाते.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या टोकाकडून येणारी गाडी रद्द झाल्यामुळे जामनगर ते तिरूनेलवेली (19578) ही दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी प्रवास सुरू होणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.
सुरत, वापी, बोईसर, वसई रोड, पनवेल, रत्नागिरी, मडगाव मार्गे ही गाडी दक्षिणेतील तिरुनेलवेलीला जाते. ही गाडी आठवड्यातून दोन दिवस कोकण रेल्वे मार्गे धावते.
तिरुनलवेलीकडून जामनगरकडे येणारी गाडी रद्द झाल्यामुळे 23 डिसेंबरची जामनगरहून तिरुनेलवेलीला जाणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.
- हेही अवश्य वाचा : Konkan Railway | दिवा-रत्नागिरी पॅसेंजर लवकरच धावणार नव्या रंगरूपात !
- Konkan Railway | तीन महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून ८६ लाख ६७ हजारांचा दंड वसूल
- Konkan Railway | ख्रिसमससाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी चार विशेष गाड्या
