आष्टे लॉजिस्टिक कंपनीत कोकण श्रमिक संघाची एन्ट्री!

कामगारांच्या हक्कासाठी श्रुती म्हात्रेंचा एल्गार

उरण दि. २७ (विठ्ठल ममताबादे ) : गेली अनेक वर्षे आष्टे लॉजिस्टिक प्रा.लि. या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना श्रमाचा योग्य मोबदला अर्थात पगार वाढ मिळत नसल्याने सर्व कामगारांनी त्यांचे नेतृत्व करण्याचे अधिकार कोकण श्रमिक संघाला देण्याचा निर्णय घेत आष्टे लॉजिस्टिक येथील भूमिपुत्र असलेल्या पिढीत कामगारांना कंपनीच्या व्यवस्थापनाकडुन होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता तसेच न्याय मिळवून देण्यासाठी कोकण श्रमिक संघाच्या कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या आवारात नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

आष्टी लॉजिस्टिक कंपनीने कामगारांच्या जमीनी घेऊन त्यांना कमी पगारावर कामावर ठेऊन घेतले होते.मात्र या कामगारांना दहा वर्षाहून अधिक काळ याठिकाणी झाल्याने कंपनीला वारंवार पगारवाढी बाबत विचारणा करून देखील पगारवाढ होत नसल्याने कामगारांवर होणारा अन्याय कुठेतरी थांबला पाहीजे यासाठी बहुसंख्य कामगारांनी कोकण श्रमिक संघाला आपले नेतृत्व करण्याचा अधिकार दिल्याने दि. २७ रोजी सकाळी ११.०० वाजता आष्टे लॉजिस्टिक प्रा.लि. कंपनीसमोर कोकण श्रमिक संघाच्या नामफलकाचे अनावरण कामगार नेत्या श्रुती शाम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत कामगारांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे असल्याचे सांगितले तर श्रृती म्हात्रे यांनी पिढीत कामगारांना संबोधित करतांना कामगारांच भल होत असेल तर युनियन नसली तरी सुद्धा मी कामगारांच्या पाठीशी कायम उभी असणार व त्यांना योग्य न्याय मिळवुन देणार असा विश्वास व्यक्त करत आमच्या भुमिपुत्रांचा हक्क आम्ही कोणत्याही परिस्थितीत घेऊन राहु असा देखील यावेळी आष्टे लॉजिस्टिक कंपनीच्या व्यवस्थापनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. यावेळी कामगारांचे नेते नाना म्हात्रे, वसंत काठावले, कोकण श्रमिक संघाचे एकनाथ ठोंबरे, माथेरान युनिट अध्यक्षा ॲड. प्रिया वहालकर-शिंदे, माथेरानचे माजी नगरसेवक दिनेश सुतार, नरहरी घरत, भगवान घरत, परेश घरत, सचिन पाटील, रेवनाथ पाटील, लायन्स ग्रुप अध्यक्ष बाळुशेठ फडके उपाध्यक्ष रविशेठ शेळके ,आकाश पाटील, संदिप पाटील, सुरेश नाईक, संजय घरत, नितिन पाटील, उत्तम भोईर, देवेंद्र पाटील स्थानिक सरपंच, उपसरपंच, सदस्य व परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच बहुसंख्य महिला यावेळी आवर्जुन उपस्थित होत्या.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE