मोठी जुई प्रीमियर लीग २०२३ क्रिकेट स्पर्धेत दीप पाटील ठरला मालिकावीर!

उरण दि. ३ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील मानाची क्रिकेट लीग स्पर्धा समजली जाणारी “मोठी जुई प्रीमियर लीग” २०२३ च्या तिसऱ्या पर्वाचे दिमाखदार आयोजन मोठीजुई गावातील मी मराठी ग्रुपने केले होते. पाच दिवशीय क्रिकेट लीग स्पर्धा मोठ्या जल्लोषात पार पाडली गेली.

या स्पर्धेसाठी मोठीजुई गावातील एकूण १६ संघांनी सहभाग नोंदवून लिलाव बोली स्वरूपात गावातील खेळाडूंना १६ टीम मालकांनी खरेदी केले होते. या स्पर्धेत अनुक्रमे ४ क्रमांक आणि गोलंदाज,फलंदाज, क्षेत्ररक्षक साठी स्पोर्ट सायकल यांना स्मार्टसिटी डेव्हलपर्सचे मालक प्रविणदादा घासे यांच्या कडून आकर्षक चषक देण्यात आले होते. या महत्वाच्या स्पर्धेत मालिकावीर साठी सरपंच दीपकदादा भोईर यांच्याकडून होंडा कंपनीची बाईक देण्यात आली होती. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात अक्कादेवी संघावर मात करत विलास कामोठकर यांचा फंटूष इलेव्हन क्रिकेट संघ प्रथम क्रमांकाच्या चषकाचा मानकरी ठरला आणि दीप भरत पाटील यांनी मालिकावीर चषकावर आपलं नाव करून बाईक जिंकण्याचा स्वप्नं साकार केलं. उत्कृष्ट फलंदाज यश भोपी, उत्कृष्ट गोलंदाज विनेश कोळी तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शुभम पाटील हे मानकरी झाले.

या स्पर्धेत द्वितीय क्रमांक रमाकांत पाटील यांचा अक्कादेवी चॅम्पियन, तृतीय क्रमांक निखिल भोपी यांचा शिवराजे प्रतिष्ठाण तर चतुर्थ क्रमांक प्रशांत पाटील यांचा शिवाज्ञा संघाने पटकावलं, मोठीजुई गावातील आक्कादेवी मैदानावर संपन्न झालेल्या मोठी जुई प्रीमियर लीगसाठी वसंत भोईर, रमेश पाटील, यशवंत पंडित यांचे मी मराठी संघाला मोलाचे सहकार्य लाभले असून ही स्पर्धा मोठ्या जल्लोषात संपन्न झाली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE