विद्यार्थींनींनी सादर केले बहारदार लेझीम नृत्य !

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य; छोट्या मुलांचे मानवी मनोरे ठरले आकर्षण

संगमेश्वर : शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थी कला – क्रिडा क्षेत्रातही चमकावेत यासाठी शाळास्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. अशा स्पर्धातूनच क्रिडा नैपुण्य असणाऱ्या विद्यार्थ्यांची चुणूक दिसून येते. ग्रामीण भागातील विद्यार्थी शरीराने काटक असतात. अशा विद्यार्थ्यांना उचित मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेऊ शकतात . विद्यार्थ्यांमधील खेळाचे असे वेगळे गुण हेरण्याचे काम पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या क्रीडा विभागाने केले असून यातूनच प्रजासत्ताक दिनी इयत्ता नववी अ,ब च्या मुलींनी सादर केलेले बहारदार लेझीम नृत्य आणि इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले चित्तथरारक मानवी मनोरे पाहून उपस्थित पाहुणे मंडळी भारावून गेली.

संस्था पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या लेझीम नृत्य आणि मानवी मनोऱ्यांचे भरभरून कौतूक केले . व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वरच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलने प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून उपस्थित संस्था पदाधिकारी आणि पाहुणे मंडळींसमोर इयत्ता नववी अ, ब च्या मुलींनी नऊवारी साडी नेसत पारंपारिक वेशात लेझीम नृत्याचे विविध प्रकार सादर केले. पाचवीच्या छोट्या मुलांनी विविध प्रकारचे मानवी मनोरे सादर करत आपले कौशल्य दाखवले.

धाडस, तोल सांभाळणे आणि कौशल्य अशा गुणांचा मिलाफ असलेले छोट्या मुलांचे मानवी मनोरे पाहून उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. प्रारंभी संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . विद्यार्थ्यांनी उत्तम संचलनाने उपस्थितांना मानवंदना दिली . प्रशालेतील विद्यार्थींनींनी देशभक्तीपर गीत सादर केले. पंचरंगी कवायतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

चित्तथरारक मानवी मनोरे सादर करतांना पैसा फंडच्या विद्यार्थी. ( छाया – मिनार झगडे, संगमेश्वर )

यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे , सचिव धनंजय शेट्ये , सह सचिव अनिल शिंदे , संदीप सुर्वे , रमेश झगडे , समीर शेरे, बाबा नारकर , मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदि मान्यवर उपस्थित होते.

सजविलेल्या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता, भारत माता, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी अशा विविध प्रकारच्या वेशभूषा करून संगमेश्वर बाजारपेठेतून लेझीम नृत्याच्या साथीने सर्व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. संस्थेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केल्यानंतर प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चिता कोकाटे

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE