उरण (विठ्ठल ममताबादे ) : जागतिक पर्यावरण दिननिमित्त मा. उरण कोर्टाच्या न्यायाधीश श्रीम. पी. एन. पाथाडे, उरण बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.दत्तात्रेय नवाळे, ॲड. पराग म्हात्रे, ॲड. अनुराग ठाकूर, ॲड. सागर कडू व ॲड. अमर पाटील इ. मान्यवरांनी फुंडे गावातील श्रीराम मंदिराच्या परिसराभोवती वृक्षारोपण करण्यासाठी हजर होते.तसेच फुंडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सागर घरत व ग्रामपंचायत सदस्या हर्षा जीवन घरत, जुईली विश्वजित घरत,कविता केतन म्हात्रे, रुचिता प्रितम म्हात्रे व प्रितम चंद्रकांत म्हात्रे (शाखाप्रमुख शिवसेना), अमर रामचंद्र म्हात्रे ( माजी उपसरपंच), मुकुंद मोरेश्वर म्हात्रे, बाबुराव तुकाराम म्हात्रे, परशुराम बाळाराम म्हात्रे, किशोर पाटील, योगेश दत्ताराम म्हात्रे, जगदिश कीशोर म्हात्रे व ग्रामस्थ उपस्थित होते.
दि. ५ जून १९७२ रोजी युनो संघटनेची परिषद भरली होती आणि तेव्हापासुन जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो आणि दि. ५ जून रोजी पर्यावरण दिनाला ५० वर्षे पुर्ण झाली त्याअनुषंगाने लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मा. उरण कोर्टाने हा कार्यक्रम राबविला होता. फुंडे गावचे सरपंच सागर घरत यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले तर उरण बार असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रेय नवाळे यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व ग्रामस्थांना सांगितले आणि ॲड.अमर पाटील यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.



