रत्नागिरी, दि.३० : जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे फेब्रुवारी २०२४ चा लोकशाही दिन सोमवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १ ते २ या वेळेत होणार आहे.
लोकशाही दिनासाठी नागरीकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरिकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शुभांगी साठे यांनी कळविले आहे.
