रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या पोरबंदर ते कोचुवेली एक्सप्रेसला जादा कोच जोडण्यात येणार आहे.
कोकणसह गोव्यातील पर्यटन हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांना गर्दी होत असल्यामुळे रेल्वेने काही गाड्यांना अतिरिक्त कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार पोरबंदर ते कोचुवेली (20910) या गाडीला दिनांक १ फेब्रुवारीच्या फेरीसाठी तर कोचुवेली ते पोरबंदर (20909) या परतीच्या प्रवासात धावताना या एक्सप्रेस गाडीला दि. 4 फेब्रुवारी 2024 रोजीच्या फेरीसाठी स्लीपर श्रेणीतील एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.
