मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगातर्फे राज्यभर सुरू असलेले सर्वेक्षण उद्या शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी रात्री २३. ५९ मिनिटांनी संपणार आहे.
सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच महानगरपालिका आयुक्तांनी याबाबत सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकांना सूचना देण्यात याव्यात असे मागासवर्ग आयोगाने कळविले आहे. तसेच शनिवार ३ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आयोगाकडे पाठवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत
