नवघर ग्रामस्थांचे आंदोलन तूर्तास स्थगित

उरण (विठ्ठल ममताबादे) : मु.नवघर ता.उरण जिल्हा रायगड येथील विविध समस्या संदर्भात सोमवार दि.०६/०६/२०२२ रोजी नवघर ग्रामस्थांच्या वतीने सिडको कार्यालय द्रोणागिरी नोड बोकडविरा उरण येथे पुकारण्यात आलेले धरणे आंदोलन सिडकोचे कार्यकारी अभियंता एच. डी. नहाने  यांच्या मध्यस्थीने तुर्तास स्थगित करण्यात आले असून एच डी नहाने यांनी वरिष्ठ अधिकारी पी एम सेवतकर यांच्या सोबत ग्रामस्थांची चर्चा घडवून दिली असता नवघर ग्रामस्थांच्या समस्या१) नवघर ते नवघर फाटा रेल्वे क्राॅसिंग  रस्ता२) रेल्वे स्टेशनला  “नवघर” नाव देण्यात यावे तसेच३) मौजे नवघर येथे होणा-या रेल्वे स्टेशन मध्ये निर्माण होणा-या नोक-या आणि व्यवसायामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्यावे, असे मागण्या(समस्या )आ‌ॅन स्पीकर फोनवर समजावून घेऊन सिडकोचे वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वे प्रशासन यांच्या सोबत  १५ सप्टेंबर २०२२ तारखेपर्यंत नवघर ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेऊन योग्यतो निर्णय देण्याचे मान्य केले असता जर १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत जर योग्य निर्णय झाला नाही तर आम्ही ग्रामस्थ उग्र आंदोलन करणार असे नवघर ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले आणि धरणे आंदोलन दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सिडकोची राहिल असेही ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले.

या वेळी नवघर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाटील,नवघर ग्रामपंचायतीचे उपसरपंच रवीशेठ वाजेकर,रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील,जेष्ठ नागरिक संघटनेचे सुरेश तांडेल, नवघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शेखर तांडेल,माजी उपसरपंच विश्वास तांडेल,शिवसेना शाखा प्रमुख अविनाश म्हात्रे,अमित जोशी,समाधान तांडेल,राजेश पाटील,नवघरचे माजी अध्यक्ष जयप्रकाश भोईर,मोतीराम डाके,जयवंत पाटील,मोहन भोईर,एकनाथ म्हात्रे,अनिल पाटील,लक्ष्मण पाटील,जनार्दन जोशी,विनोद पाटील,चेतन भोईर,विशाल काटे,मंदार कडू,किशोर कडू,महेश भोईर,रणजीत म्हात्रे,राजन पाटील,रामचंद्र मढवी यांच्या सहित नवघर,नवघरपाडा आणि कुंडेगावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE