दरवर्षी महामंडळाची सुमारे २३४ कोटी रुपयांची होणार बचत
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एकूण ५००० डिझेल गाड्यांचे येत्या तीन वर्षांमध्ये एलएनजी वाहनांमध्ये रुपांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार तीन वर्षामध्ये एकूण ६ टप्प्यांमध्ये हे रूपांतरण करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत संपूर्ण पाच हजार बसेसचे रुपांतरण झाल्यानंतर दरवर्षी महामंडळाचे सुमारे २३४ कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होईल.
राज्यातील ९० आगारांमध्ये एलएनजी इंधन भरण्याची सोय करण्यात येणार आहे.
