महाराष्ट्र क्रांती सेना महायुतीमध्ये सामील

  • महायुतीचे समन्वयक आ. प्रसाद लाड यांची माहिती

मुंबई : राज्यातील मराठा समाजासह वंचित घटकांच्या प्रश्नांवर कार्य करणारी महाराष्ट्र क्रांती सेना महायुतीमध्ये सामील झाल्याची माहिती महायुतीचे समन्वयक आमदार प्रसाद लाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र क्रांती सेना ही महायुतीचा घटक पक्ष म्हणून कार्य करेल असे श्री.लाड यांनी पत्रकात नमूद केले आहे .

आ.लाड यांनी पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र क्रांती सेनेच्या सहभागामुळे महायुतीला अधिक बळ मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच महायुतीतील इतर घटक पक्षांच्या सहमतीने महाराष्ट्र क्रांती सेना महायुतीमध्ये सामील झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाचे नवे उच्चांक गाठत असून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा ‘महाविजय 2024’ हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष एकदिलाने काम करतील असा विश्वासही आ.लाड यांनी पत्रकात व्यक्त केला आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE