निरामय योग संस्था रत्नागिरीतर्फे १६ फेब्रुवारीला रत्नागिरीत जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धा

रत्नागिरी : निरामय योगसंस्था, रत्नागिरी पुरस्कृत जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धा शुक्रवार दि.१६ फेब्रुवारी २०२४ रोजी रथसप्तमीनिमित्त सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

योग्य व शास्त्रशुद्ध पद्धतीने जास्तीत जास्त सूर्यनमस्कार घालणाऱ्या विजेत्यांना प्रथम पारितोषिक रुपये 3001, द्वितीय 2001, तृतीय 1001 आणि आकर्षक चषक देवून गौरविण्यात येईल. विशेष लक्षवेधी दहा स्पर्धकांना आकर्षक चषक देण्यात येईल. मा. श्री निलेश माईनकर , उपविभागीय पोलिस अधिकारी ( DYSP) रत्नागिरी यांच्या हस्ते विजय विजेत्यांना पारितोषिक देण्यात येईल.

स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेण्याचे आवाhन निरामय चे योग गुरू ,( पतंजलिचे आंतरराष्ट्रीय दर्जाप्राप्त योगगुरू ) श्री. विरू स्वामी सर यांनी केले आहे स्पर्धेचे ठिकाण : थिबा पॉइंट रोड मा.जिल्हाधिकारी निवास स्थानाजवळ, रत्नागिरी.

वेळ पहाटे 05.30 ते 09.00

नाव नोंदणीसाठी खालील व्हॉट्सॲप क्रमांकावर आपले पूर्ण नाव , पत्ता आणि वय मेसेज करून नाव नोंदणी करून घेणे.

नोंदणीसाठी व्हॉट्सॲप नंबर9028899412(नियम आणि अटी लागू)

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE