आवरे येथे योग वर्ग शिबिर संपन्न

उरण (विठ्ठल ममताबादे )  : आत्माराम ठाकूर मिशन संचालित (रजि.) जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे व श्री अंबिका योग कुटीर, ठाणे, शाखा नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने उरण तालुक्यातील आवरे येथे योग शिबिर संपन्न झाले. कार्यक्रमाचे उ‌द्घाटन श्री अंबिका योग कुटीर ठाणे, नवी मुंबईचे विभागीय संचालक उत्तमराव पवार यांनी केले. यावेळी त्यांनी म्हटले की, योग केल्यामुळे सर्व रोग नष्ट होतात तसेच डॉक्टर कडे जाण्याची गरज नाही. श्री अंबिका योग कुटीरचे संस्थापक हटयोगी निकम गुरुजी यांच्या जीवनाबद्दल माहिती दिली. तसेच योगाचा प्रसार व्हावा व सर्व भारत रोग मुक्त व्हावा याच साठी श्री अंबिका योग कुटीरचा प्रयत्न आहे.
यावेळी प्राणायाम, आसने तसेच धोती, जलनेती व महत्त्वाचे म्हणजे त्राटक हे श्री अंबिका योग कुटीर ठाणे शाखा नेरूळच्या साधकांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह करून दाखविले. नेरूळ शाखेचे संचालक संजय भोसले यांनी म्हटले की त्राटकामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती तसेच एकाग्रता वाढते म्हणून विद्यार्थ्यांनी दररोज त्राटक व जलनेती करणे गरजेचे आहे.
यावेळी योगासनाचा राजा शिर्सासन, धनुरासन, मकरासन, गोमुखासन अशी कठीण आसने करून दाखविली. या तीन दिवस चालणाऱ्या शिबिरात एकूण २०८ विद्यार्थ्यांनी व १० शिक्षकांनी भाग घेतला होता या विद्यार्थ्यांना नवी मुंबईचे विभागीय संचालक उत्तमराव पवार नेरूळ शाखेचे संचालक संजय भोसले शशिकांत पाडेकर, विनोद भूजोनेय, मिलिंद नारखेडे, रत्ना प्रभू, सुविधा शर्मा, संध्या सानस या साधकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक ठाकूर, शाळेच्या मुख्याध्यापिका निकिता म्हात्रे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यास शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE