उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार योजनेंतर्गत प्रवेशिका पाठविण्यास मुदतवाढ

  • इच्छुक पत्रकारांनी आपले प्रस्ताव २९ फेब्रुवारी पर्यंत सादर करावेत

ठाणे, दि.१७ माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी दि. 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दि. 31 जानेवारी 2024 असा होता. या प्रवेशिका मागविण्याकरीता आता 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-३२, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in व www.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE