रत्नागिरी : रत्नागिरीतील निरामय योगा संस्था, पतंजलीचे मुख्य योग प्रशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक विरू स्वामी सर यांच्यातर्फे दर रविवारी पहाटे ६ ते सकाळी ८ या वेळेत थिबा पॉइंट रोड, जिल्हाधिकारी बंगला गेटसमोर योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नाडी परीक्षण करून सर्व आजाराचे निदान करणे, रोगानुसार योग प्रशिक्षण, अग्नि, वायू, आकाश, पृथ्वी, जल या पंचतत्त्वाच्या सान्नीध्यात योग करण्याचा सुवर्ण लाभ, सर्व वयोगटासाठी विशेष मार्गदर्शन अशी या शिबिराची खास वैशिष्ट्ये आहेत.
या योग शिबिरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करिता 9028899412 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पतंजलीचे रत्नागिरी येथील मुख्य योग प्रशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक श्री विरू स्वामी सर यांनी केले आहे.
शिबिरात सहभाग घेणाऱ्यांनी येताना आपल्या सोबत योगा मॅट किंवा सतरंजी अशी बैठक व्यवस्था घेऊन येणे गरजेचे आहे.
