गोपाळ म्हात्रे महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

उरण दि २६ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्याचे सुपुत्र तथा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक गोपाळ दिनकर म्हात्रे यांना सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल २५ फेब्रुवारी २०२४ रोजी ठाणे येथे वेध फाउंडेशन कोल्हापूर, समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग, अनुश्री महिला संस्था नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कला साहित्य संमेलन ठाणे येथे महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार पुरस्कार २०२४ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.महाराष्ट्रातिल एकूण विविध क्षेत्रात काम केलेल्या ७० व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारासाठी लाभलेल्या ज्येष्ठ व्यक्तीच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला

या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, कवी, गझलकार शिक्षणतज्ज्ञ डॉ.लक्ष्मण शिवणेकर ज्येष्ठ अभिनेते जयराज नायर यांच्या हस्ते पुरस्कारमुर्तींना पुरस्कार वितरीत करण्यात आले.

यावेळी विशेष अतिथी म्हणून मराठी अभिनेत्री नूतन जयंत,चित्रपट निर्माती, उद्योजक, समाज सेविका नेहा निनाद धुरी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अ.ना. रसनकुटे, समाजसेविका ठाणे डॉ. रागिणी चवरे ,अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद अध्यक्ष राजेश्री बोहरा, आयोजक डॉ. प्राध्यापक बी एन खरात संचालक समृद्धी प्रकाशन, निमंत्रक राजेश्री काळे निवड समिती, श्वेता शिर्के डोंबिवली, डॉक्टर सनी वालिका आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE