रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसर सुशोभिकरणाची पायाभरणी

प्रवाशांना मिळणार विमानतळावरील वातावरण -रविंद्र चव्हाण


रत्नागिरी, दि.१ (जिमाका) : विमानतळावरील वातावरणाप्रमाणे रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला तशा वातावरणाचा अनुभव आला पाहिजे. वाहनतळ, एसटी स्टँड, रिक्षा स्टँड वेगळ्या ठिकाणी असलं पाहिजे. आनंदमय आणि अल्हाददायक वातावरण प्रवाशांना देण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केला जात आहे, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांनी दिली.


येथील रेल्वे स्टेशन इमारत परिसर विकास व सुधारणा करणे कामाचा पायाभरणी समारंभ सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करुन झाला. यावेळी माजी आमदार बाळ माने, माजी आमदार प्रमोद जठार, सिंधुरत्न चे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, राजेश सावंत आदी उपस्थित होते.
पायाभराणी समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, पर्यटनाला चालना देण्याचे काम रेल्वे करत आहे. रेल्वेच्या जागेमध्ये येणाऱ्या प्रवाशांना, पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीकोनातून त्याच्या सुशोभिकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग निधी देत आहे. त्याबाबत केंद्र आणि राज्यातील प्रमुख मंडळी तसेच अधिकारी यांच्यात सामंजस्य करार झालेला आहे. विमानतळावर गेल्यावर जो अनुभव प्रवाशांना मिळतो, त्याच वातावरणाचा अनुभव रेल्वे स्टेशनवर देण्याचा या सुशोभिकरणातून प्रयत्न आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग मधील प्रमुख रेल्वे स्टेशन या माध्यमातून सुशोभिकरण करण्यात येत आहेत. महामार्गापर्यंत असणारा रस्ता काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. चांगल्या सौंदर्यीकरणातून चांगल्या सुविधा देण्यासाठी चांगले आर्किटेक्टमध्ये स्पर्धा घेण्यात आली. त्यातून चांगल्या डिझाईन तयार करण्यात आल्या.


पर्यटन स्थळांची माहिती याठिकाणी मिळेल. याचा फायदा स्थानिकांबरोबर पर्यटकांनाही मिळणार आहे. हे काम दोन महिन्यात पूर्ण होणार आहे, असेही ते म्हणाले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE