मनसे महिला महोत्सव उत्साहात संपन्न

उरण (विठ्ठल ममताबादे ): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अर्धांगिनी शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उरण रायगड मनसेने मनसे महिला महोत्सवाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाचे उद्घाटन मनसेच्या सरचिटणीस रिटाताई गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर यांनी या मनसे महिला महोत्सवाचे आयोजन केले होते.ह्या महोत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

तसेच महिलांचा आवडता खेळ पैठणीचा घेण्यात आला. ह्या खेळात ६० वर्षा वरील महिलांनी देखील भाग घेतला व आपली हौस भागवली. शेकडो महिलांनी उपस्थिती दाखवली. सदर कार्यक्रमास  सिने कलावंत मयुरेश कोटकर व सिरीयल फेम अनघा कडू यांनी देखील उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रमाची रूपरेषा श्री समर्थ कृपा स्वयं सहाय्यता संस्थेच्या अध्यक्षा रायगड भूषण संगीताताई ढेरे यांनी आखली होती.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे रायगड जिल्हा चिटणीस केसरीनाथ पाटील, रायगड जिल्हा मनसे महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा आदीतीताई सोनार,तालुका अध्यक्षा वर्षाताई पाचभाई, उरण महिला संस्थेच्या गौरी देशपांडे,पत्रकार रुचिता मलबारी,ऋजुता परब, रेखा पवार,रुपाली मूरकुटे, प्रीती खानविलकर, अतुल चव्हाण,संजय मूरकुटे,गणेश बनकर,राजू मुंबईकर,मंगेश वाजेकर,राकेश भोईर उपस्थित होते.खेळ खेळूया पैठणीचा ह्या कार्यक्रमासाठी पैठणी साडी उरण मधील पूर्णिमा शॉपिंगचे श्रीपाल मेहता यांनी दिली.तसेच सोन्याची नथ व चांदीचे पैंजन वैवडे गोल्ड स्मिथ चे मालक उमेश वैवडे यांनी दिले. ह्या कार्यक्रमाला आई इन्फ्राचे नरसु पाटील  व मनसे रोजगार स्वयं रोजगारचे उपजिल्हा संघटक रितेश पाटील यांनी मोलाच सहकार्य केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आयोजक मनसे जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर व संगिता ढेरे यांच्या समवेत पूजा प्रसादे,अनघा ठाकूर,सुप्रिया सरफरे,अर्चना साळुंखे,छाया तांडेल,वैदेही वैवडे,कविता म्हात्रे यांनी विशेष मेहनत घेतली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE