- उद्योग मंत्री उदय सामंत यांची शुभारंभ सोहळ्याला उपस्थिती
मुंबई : मुंबई ते शिर्डी अशी पालखी पदयात्रा शिर्डीच्या दिशेने मार्गस्थ झाली. राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत हे पालखी पदयात्रेच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित होते.

साईलीला मंडळ, लालबाग यांच्या वतीने मुंबई ते शिर्डी असा पदयात्रा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने साई भक्त या पदयात्रेत सहभागी झाले आहेत
पालखी पदयात्रा सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी मंडळाचे संस्थापक श्रावण बाळा इंगळे, अशोक वालम, राम खाटपे, नितीन गायकवाड, विनायक लोके, सुमित महाडिक तसेच मंडळाचे पदाधिकारी, साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखीच्या शिर्डीच्या दिशेने पायी प्रवासासाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या.
- हे सुद्धा वाचा : मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही मिळू लागली!
- कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ
- Konkan Railway | उधना-मंगळुरू स्पेशल फेअर ट्रेन ५ जूनपर्यंत धावणार!
