Mumbai-Goa Highway | हातखंबा येथे डंपरची दुचाकीला धडक बसून महिलेचा जागीच मृत्यू

  • दुचाकीस्वारासह चार वर्षांची बालिका बचावली

नाणीज : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा येथे एका भरधाव डंपरने दुचाकीला मागील बाजूने जोरदार धडक दिल्याने नाणिज येथील एक महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार व त्याची मुलगी या अपघातातून बचावली असून दोघेही जखमी झाले आहे. अपघातात जखमी झालेल्या चार वर्षीय बालिकेला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे. रविवारी संध्यकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
या अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव सौ. कल्पिता किशोर घडशी असे आहे. ती नाणिज येथील रहिवासी आहे. कोकण रेल्वे येथे त्या कामाला होत्या. रविवारी सायंकाळी त्या दत्तात्रय नारायण दरडी यांच्या दुचाकीवरून पालीहून रत्नागिरीकडे येत होत्या. हातखंबा तिठ्याकडे येत असताना तेथील गद्रे पेट्रोलपंपापासून काही अंतरावर वळणावर वेगातील डंपरेने दुचाकीला जोरदार ठोकर दिली.
या अपघातात कल्पिता घडशी यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे महामार्गावर घटनास्थळी रविवारी सायंकाळी वाहतूकीची कोंडी झाली होती. अपघातानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी सेवाभावी संस्थेच्या खासगी रुग्णवाहिकेतून दाखल केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE