लांजातील तळवडे येथे २२ एप्रिलला जिल्हास्तरीय ताशा वादन स्पर्धा

लांजा :  तळवडे ता.लांजा संस्कार प्रतिष्ठान यांच्या वतीने २२ एप्रिल २०२४ रोजी जिल्हास्तरीय ताशा वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तळवडे वरचीवाडी विठ्ठल मंदिर येथे हनुमान जयंती उत्सवानिमित्त ताशा वादन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे

स्पर्धेतील प्रथम विजेता ७ हजार आणि ट्रॉफी, दुसरा ५ हजार, तिसरा 3 हजार आणि ट्रॉफी अशी बक्षिसे आहेत.  यासाठी प्रवेश फी 200 आहे. स्पर्धेत 10 मिनिटे ताशा वादन कला सादर करता येईल. भाग घेण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष उदय पाटोळे 8669134511, संजय पाटोळे 976718 2317 मुन्ना पाटोळे 8975643665 यांच्या शी संपर्क साधावा.

दि. 23 एप्रिल रोजी श्री सत्यनारायण महापूजा,महाप्रसाद, हळदीकुंकू, प्रसिद्ध मनोरंजन कार्यक्रम संगमेश्वरी बाज आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE