गुहागर : श्री देव हनुमान देवस्थान फंड
बाजारपेठ-गुहागर येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, दि. २३ रोजी श्री व्याडेश्वर मंदीर प्रांगणात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्त आयोजित कार्यक्रमात सकाळी ६ ते ८ वा.जन्मोत्सवाचे किर्तन किर्तनकार – प्रा. सौ. मनाली मनोज बावधनकर,सकाळी ९ ते १० वा. श्रींची पुजा, अभिषेक, लघुरुद्र. दुपारी ११ ते १२ वा.आदिती धनावडे व साथीदार यांचे सुश्राव्य भजन स्वरसाधना महिला भजन मंडळ, खालचापाट गुहागर यांचे भजन. दुपारी १२ वा.महाआरती
दुपारी ४ ते ५ वा.श्री कलावती आई भजन मंडळ यांचे भजन
सायं. ५ ते ६ वा. रश्मी भावे व साथीदार यांचे सुरभी भजन मंडळ,खालचापाट गुहागर यांचे भजन, . सायं. ६ ते ८.लळीताचे कीर्तन आदींचा समावेश आहे
वरील सर्व कार्यक्रमांस सहकुटूंब, मित्रपरिवारासह उपस्थित रहावे असे आवाहन हनुमान देवस्थान फंड, बाजारपेठ गुहागर यांनी केले.
- हे सुद्धा वाचा : मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही मिळू लागली!
- कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ
