लांजा : उष्णतेची लाट पसरल्याने प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना राज्य सरकारने शाळेत उपस्थित राहण्यास सवलत दिली असून उद्या दि. 22 एप्रिलपासून 2 मे म्हणजे उन्हाळी सुट्टी सुरू होईपर्यंत ही सवलत आहे.
प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या सर्व विद्यार्थ्यांना ही सवलत असल्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत. अलीकडे तापमानात वाढ होत असून, उष्णतेची लाट पसरली आहे. आरोग्य विभागाने आरोग्याच्या दृष्टीने सर्वाना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे

उष्माघात, चक्कर येणे आदी आरोग्य समस्या सुरू झाल्या आहेत. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत तापमान तीव्रता अधिक प्रमाणात आहे. शालेय विद्यार्थी यांना संरक्षण मिळावे, यासाठी शाळेत उपस्थित रहण्यास सवलत देण्यात आली आहे. राज्य शासनाचे शिक्षण संचालक यांच्या आदेशानुसार हे आदेश देण्यात आले आहेत.
