मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून रत्नागिरीतील मतमोजणी केंद्राची पाहणी


रत्नागिरी, दि. 28 :  राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज मिरजोळे एम आयडीसी येथे असणाऱ्या शासकीय गोदामातील मतमोजणी केंद्राला भेट देवून पाहणी केली. तसेच कुवारबाव येथील सामाजिक न्याय भवन मधील इव्हीएम कमिशनिंग केंद्राला भेट देवून पाहणी करुन समाधान व्यक्त केले.


यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी यावेळी त्यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सर्वसाधारण निरीक्षक राहुल यादव, खर्च निरीक्षक अंकुर गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, परिविक्षाधीन आय एस डॉ.जस्मीन, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE