केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रत्नागिरी येथे उद्या जाहीर सभा

  • रत्नागिरी सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांच्या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शहा यांची तोफ धडाडणार आहे. अमित शहा सभेनिमित्त प्रथमच येत असून येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विराट सभा होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री, भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी दिली.

उमेदवार नारायणराव राणे यांच्या प्रचारासाठी यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राजापूर येथे सभा घेतली. आता अमित भाई शहा येणार आहेत. ३ मे रोजी दुपारी एक वाजता ही सभा होणार आहे. या सभेकरिता मंडप व्यवस्था पूर्ण झाली आहे. पूर्ण मैदानावर मंडप आहे, या ठिकाणी हजारो लोक एका वेळेला बसू शकतात. या सभेकरिता नियोजन करण्यात आले आहे. सभेला येणाऱ्या लोकांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. महायुतीतील सर्व पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी नेतेमंडळी या सभेकरता उपस्थित राहणार आहेत. सहा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने रत्नागिरीत दाखल होणार आहेत, असे ना. रवींद्र चव्हाण म्हणाले.

नारायण राणे यांच्या प्रचाराच्या सभा सर्व ठिकाणी होत असून प्रत्येक बुथवर कार्यकर्ता सक्रिय झाला आहे. आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, किरण सामंत, लोकसभा सहप्रभारी तथा माजी आमदार बाळासाहेब माने, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, लोकसभा प्रभारी प्रमोद जठार, राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजश्री विश्वासराव, प्रमोद अधटराव यांच्यासमवेत सर्व विधानसभा प्रमुख सर्व पदाधिकारी सक्रिय नियोजन करत आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE