रेयांश बने स्केटिंग स्पर्धेत रौप्यपदकाचा मानकरी!

सहाव्या नॅशनल रँकिंग स्पर्धेसाठी निवड

भांडूप (सुरेश सप्रे) : इंडियन स्केटिंग ६व्या नॅशनल रॅकींग ओपन स्पिड स्केटिंग स्पर्धेसाठी रेयांश पृथा पराग बने हा पात्र ठरला आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या स्पर्धेत त्याने रौप्यपदक पटकावले. रेयांशने स्केटिंग १००मिटर अंतर १४.३९ सेकंदात पार करत नव्या विक्रम करत पात्रता फेरीत प्रवेश केला आहे.


त्याला ठाणे जिल्हा संघाचे कोच निहाल प्रसाद यांच्या मार्गदर्शन लाभले. रेयांश हा माजी आमदार सुभाष बने यांचा नातु असून उबाठा शिवसेनेचे भांडूपचे उप विभाग प्रमुख पराग बने यांचा सुपुत्र आहे.


रेयांश च्या या विक्रमी यशाबद्दल भांडूप सह देवरूख परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE