रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर दि. 24 मे 2024 रोजी सावर्डे ते भोके दरम्यान अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकचा लांब पल्ल्याच्या दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार चिपळूण तालुक्यातील सावर्डे ते रत्नागिरीतील भोके दरम्यान दि. 24 मे 2024 रोजी सकाळी 7 ते 9.30 असा अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळ एर्नाकुलम ते हजरत निझामुद्दीन मंगला एक्स्प्रेस (12617) ही दि. 23 रोजी प्रवास सुरु होणारी सुपरफास्ट गाडी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान 1 तास 50 मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे. याचबरोबर तिरुनेलवेली ते गांधीधाम दरम्यान धावणारी दि. 23 मे रोजी प्रवास सुरु होणारी गाडी (20923) कोकण रेल्वे मार्गावर आल्यानंतर दि. 24 रोजी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान 1 तास 10 मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.
- हे सुद्धा वाचा : मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही मिळू लागली!
- कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ
